उमेदवारांसाठी महत्वाची सुचना
बँकेच्या सरळसेवा नोकर भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना दि. 07/09/2026, दि. 08/09/2026 व दि. 09/09/2026 या कालावधीत मौखिक मुलाखत व कागदपत्र पडताळणीसाठी दि. 30/08/2026 व दि. 31/08/2026 रोजी त्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर मुलाखत पत्र पाठविण्यात आले आहे.
तथापि, पात्र उमेदवारांची मौखिक मुलाखत घेण्यात येणार नसून, सदर मुलाखत पत्रामध्ये कागदपत्र पडताळणीबाबत नमूद केलेल्या महत्त्वाच्या सूचनांनुसार कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. तसेच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेले गुण व कागदपत्र पडताळणीमध्ये प्राप्त होणारे गुण यांची एकत्रित बेरीज करून, गुणवत्तेनुसार उमेदवारांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
तरी, संबंधित पात्र उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक ई-मेलवर नमूद केलेल्या दि. 07/09/2026, दि. 08/09/2026 व दि. 09/09/2026 या तारखांनुसार कागदपत्र पडताळणीसाठी बँकेचे मुख्य कार्यालय, गरुडबाग, धुळे येथे वेळेत उपस्थित राहावे.


